
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलगन श्री साई विद्या प्रसारक मंडळ निंभोरा संचालित कृषी तंत्र विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री अंबिका योगा कुटिर ठाणे संस्थापक निकम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे यांनी केले .

संदीप महाजन यांनी उपस्थित उपाध्यक्ष डॉक्टर सुधाकर चौधरी अध्यक्ष प्रल्हाद बोंडे भंगाळे सर विष्णू भाऊ दोडके ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ शे्लोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांना डॉक्टर चौधरी यांनी योगाचे आसन व धडे शिकवले तसेच विष्णू भाऊ दोडके यांनी मार्गदर्शन केले शेख दिलशाद यांनी गायत्रीमंत्राचा विद्यार्थ्यांना अर्थ सांगितला तसेच काशिनाथ शेलोडेयांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना योगा पासून होणारे फायदे आपले शरीर निरोगी रहावे आपली बुद्धी चकचकीत व्हावी यापुढे आपल्या मनोगतात त्यांनी वाईट व्यसनापासून दूर रहावे व नियमित योग आणि प्राणायाम करावा त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते असे सांगितले कार्यक्रमाचा समारोप शंख वाजवून करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे कर्मचारीगण भावसार सर विवेक बोंडे सर बाविस्कर कोळंबे यांनी परिश्रम केले





