विचखेडे ता.पारोळा येथील सरपंच व उपसरपंच अपात्र, शासकीय जमिनिवरील अतिक्रमण केल्याचे प्रकरण भोवले

Spread the love

जळगाव प्रतिनिधि:- विचखेडे तालुका पारोळा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्रीमती मनीषा रवींद्र पानपाटील व उपसरपंच गणपत जावला गायकवाड यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना सरपंच उपसरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे.म्हणून श्री पंडित गोबरू पवार व इतर दोन सदस्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.

त्यावर चौकशी होऊन सरपंच, उपसरपंच.यांनी बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,जिल्हाधकारी श्री अभिजित राऊत यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावरुन दिनांक 23/6/2022. रोजी अपात्र घोषित केले आहे. या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सरपंच श्रीमती मनीषा रवींद्र पानपाटील व श्री गणपत जावला गायकवाड यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृत पणे अतिक्रमण करून त्यावर सिमेंट काँक्रीटचे व पत्री शेडचे बाधकाम केलेले आहे

व अतिक्रमित जागेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना सरपंच उपसरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्री पंडित गुबरु पवार श्री आसाराम सुभान गायकवाड श्री ओंकार वरेण्या भिल यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-5/022. ने तक्रार दाखल केली असता, त्यावर सखोल चौकशी होऊन सरपंच उपसरपंच यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे भोगवटा सदरी नावे लावुन घेतले आहे

सदर जागा मिळकती ताब्यात ठेवून लाभ घेत आहेत व पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे. श्रीमती मनीषा रवींद्र पानपाटील सरपंच, व श्री गणपत जावला गायकवाड उपसरपंच व सदस्य पदावरुन जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी अपात्र ठरविले आहे. आम्ही स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही, . हा सामनेवाले यांचा बचाव देखील फेटाळण्यात आला आहे. या निकाला मुळे ग्रामस्थांन मध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

अतिक्रमण धारकांना मोठी चपराक बसली आहे. तक्ररदार श्री पंडित गुबरु पवार व इतरराचे वतीने अँड.विश्वासराव भोसले.(पिपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकाला कडे परीसराचे व तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

टीम झुंजार