प्रतिनिधी : आसावरी वायकरनगर ( दि. ८ ) : नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघ, महामार्ग वाहतुक शाखा व शहर वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संभाव्य तिसरी लाटेची शक्यता व लाॅकडाऊन लागु नये म्हणून शासनाने नियम पाळा असे आव्हान पत्रकार व पोलीस वतीने करण्यात आले व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पत्रकार दिनानिमित्त मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी महामार्ग पोलिस शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले,महामार्ग वाहतूक विभागाचे सा.फौजदार सुभाष गवते, नरेश कोडम, नितिन शेळके, अजय कदम, शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी ए.एस.आय सय्यद, शिरसाठ ,बोडखे,मोरे,खामकर एस सी ,कल्याणकर पोलिस कर्मचारी खांडे,गायतडक ,सूर्यवंशी,वर्पे उपस्थित होते . संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर व ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपस्थित नगर तालुका ग्रामीण पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकिय विश्रामगृह येथे जिल्हा संघटनेची बैठक आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नूतन जिल्हा व तालुका कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी केली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी शिवहरी म्हस्के, जिल्हा सचिवपदी संजय वायकर, जिल्हा संपर्क प्रमुखपदी विनोद साळवे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राशिनकर यांनी संघटनेचे ध्येय, धोरणे, उद्देश तसेच भविष्यात संघटनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. आज ग्रामीण भागात निर्भिड पत्रकारिता करणे म्हणजे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एक सुरक्षितता हवी असते ती ग्रामीण पत्रकार संघातर्फे मिळेल अशी खात्री आज अनेक पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पत्रकार या संघटनेत येण्यास उत्सुक आहेत. लवकरच या सर्वांना संघटनेत सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सचिव संजय वायकर म्हणाले, याआधीही आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित होतो. आता संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबविले जातील. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटनेत लवकरच सामावून घेतले जाईल. व ही संघटना जिल्ह्यात आदर्शवत संघटना म्हणुन नावारुपास येईल.
यावेळी नूतन नगर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – तालुकाध्यक्ष : अन्सार शेख, उपाध्यक्ष : अशोक तांबे, सचिव : सबील सय्यद, सहसचिव : श्याम कांबळे, कोषाध्यक्ष : रफिक शेख, सरचिटणीस : खासेराव साबळे, कार्याध्यक्ष : रियाज पठाण, कार्यकारिणी सदस्य : अमोल थोरात, बाबासाहेब तिपुळे, आसावरी वायकर, अजिनाथ म्हस्के, अमोल डोळस, रविंद्र भगत, संजय भापकर, दादासाहेब आगळे, प्रविण देशमुख, जीवाजी लगडकार्यक्रमाचे सुत्रसंचालन शारदा कुलकर्णी यांनी तर आभार रफिक शेख यांनी मानले.