सख्ख्या भावानेच संजय राऊतांच्या पाठीत खंजीर खुपसला ?
मुंबई : – बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार प्रहार करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.
राज्यातील राजकीय वातावरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत तब्बल ३९ आमदारांसह शिवसेनेला बंड केलं आहे. ६ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती चालूच आहे. उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.
त्यामुळे आता शिवसेनेत फक्त चार मंत्री शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सख्खे भाऊ शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. संजय राऊतांचे सख्खे भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.?
दरम्यान “माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेशी बेईमानी करणार नाही.” असं वक्तव्य संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण देताना केले आहे. सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला असून सुनिल राऊत हे शिंदे गटाला मिळण्यासाठी नाही तर शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
२०१९ साली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी होती असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. आपल्याला सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
दरम्यान शिंदे यांच्याकडे सामंत यांना धरून शिवसेनेचे एकूण ३९ आमदार आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत. तर विधानसभा उपाध्यक्ष्यांकडून १६ आमदारांवर कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता हा राजकीय वाद कोर्टात गेला आहे. शिंदे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.