राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आरती खंडागळे ला कास्य पदक.

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- सिंधुदुर्ग कणकवली चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन येथे 22 ते 24 जून दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 18 व्या युथ मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग संघटने अंतर्गत आरती रमेश खंडागळे हिने 50 ते 52 किलो वजन गटात खेळून चांगली कामगिरी दाखवून कास्य पदक पटकावून अमरावती विभागाचे,मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे,लोणार तालुका तर मांडवा गावाचे नाव ऊनचावीले.यावेळी भरत कुमार वावळ ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बॉक्सिंग संघटना )यांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ऑलम्पिक मधील बॉक्सिंग हा एक महत्त्वाचा खेळ आहे या खेळामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली सुद्धा कमी राहिल्या नाहीत असे आरती खंडागळे हिने दाखवून दिले.बिबी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असताना कोरोनाने कहर करून शाळा, कॉलेज बंद केले असताना पी .यु .राठोड सर यांच्या मार्गदर्शनातून तिने शेगाव येथील संकेत धामंदे कोच यांच्याकडे प्रशिक्षण घेतले व इतरही खेळांमध्ये तिने नॅशनल स्पर्धेत विजेते पद पटकाविले आहे.


सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्यांदाच अमरावती विभागातून मुलींमधून आरती खंडागळे हिने विभागातून तर जिजाऊ च्या मातृतीर्थ च्या मतदार संघातून तसेच बुलढाणा जिल्ह्यातून कास्य पदक पटकावल्यामुळे आरतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

तिच्या या कौतुकाच्या वर्षावाचे श्रेय तिने संकेत धामंदे( कोच ), व .ना. विद्यालयाचे शिक्षक, गुरुजन ,आई, वडील, यांना दिले आहे ,यावेळी मातृ तीर्थाच्या बुलढाणा जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाडू तयार व्हावेत याकरिता विठ्ठल भाऊ लोखंडकार बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष, निलेश इंगळे उपाध्यक्ष, डॉ. संतोष आंबेकर कोषाध्यक्ष, राज सोळंकी सचिव, सिद्धार्थ सरकटे सर, प्रवीण राठोड, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी बुलढाणा बॉक्सिंग संघटना प्रयत्न करीत असून आरतीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टीम झुंजार