पारोळा :- सध्या महाराष्ट्रात हल्ला केलाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे अश्यातच पारोळा तालुक्यातील एका गावातील सोसायटीच्या मतदानावरुन पारोळा तालुक्यातील दोन गट एकमेकाला भिडले. या दोन्ही गटांनी चॉपर, दांड्यांची एकमेकांवर हल्ला केला. यात सात ज गंभीर जखमी झाले. रविवार 26 जून रोजी रात्री चोरवड गावातील बसस्थानकाजवळ ही घटना घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरुन पारोळा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदानाच्या कारणावरुन वाद
राकेश रमेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, गावातील विकास सोसायटीच्या मतदानाच्या कारणावरुन किरण जिजाबराव पाटील, दर्शन विकास पाटील, जयवंत मधुकर पाटील, सचिन रवींद्र पाटील, विकास पांडुरंग पाटील, निंबा दिनकर पाटील, समाधान भिमराव पाटील, सुशिल भागवत पाटील व विशाल भागवत पाटील यांच्यासह जमावाने अचानक हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या, दांडे व चॉपरने वार केले. या हल्ल्यात राकेश पाटील यांच्यासह भुषण निंबा पाटील, विनोद रवींद्र पाटील, नितीन सुभाष पाटील व समाधान धनराज पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल
तर दुसऱ्या गटातील शैला किरण पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्या पतीसह मुलास रुग्णालयात घेऊन जात होत्या. यावेळी जमावाने त्यांना अडवले. निवडणूकीच्या कारणावरुन रमेश किसन पाटील, भुषण निंबा पाटील, सागर सुनिल पाटील, विनोद रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर दिलीप पाटील, प्रभाकर साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर जगदीश पाटील, सुधाकर पुरूषोत्तम पाटील, नितीन सुभाष पाटील, नीलेश अजबराव पाटील यांच्यासह जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. या दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम