मुंबई :- आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवलीय. आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात बंडखोर आमदारांना राजीनामा देण्याचं चॅलेंज दिलं आहे. बंडखोरांनी राजीनामा द्यावा, त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडिओ ट्विट करुन टीका केली होती. आता आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांचा एक किस्सा सांगत टीका केलीय.
संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर गुलाबराव पाटील.
गुलाबराव पाटील यांच्यावर आज सकाळी संजय राऊत यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांचा एक किस्सा सांगितला. त्यादिवशी माझ्या गाडीत बसायला गुलाबराव पाटील घाबरत होते. गाडीत बसल्यावर हात थरथरायला लागले. कशाला घाबरताय गुलाबराव असं मी विचारलं, त्यानंतर मला एका कार्यकर्त्यांनं सांगितलं की ७ वाजल्यानंतर त्यांची थरथरायची वेळी सुरु झाली, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.
मुख्यमत्र्यांच्या कामाचा आनंद वाटायला हवा होता
२० जूनला काही जणांनी बंड केलं. सध्या आमच्या संपर्कात १५ ते २० आमदार आहेत, ते आम्हाला तिथून घेऊन जा, असं सांगत आहेत. सूरत आणि गुवाहाटीमध्ये आमदार कैदी असल्यासारखं वागत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दादागिरीनं तुम्ही माणसांची मनं जिंकू शकत नाही. आज तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलत आहात, बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताय,धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताय. तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. मुख्यमंत्री करोनातील कामासाठी प्रसिद्ध झाले, त्यांच्या कामाचा त्यांना आनंद वाटला असता,असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांनी ऑफर दिलेली
फुटीरवाद्यांवर अंधविश्वास टाकला ही चूक होती, असं मुख्यमंत्र्यांना आता वाटतंय. सामान्य माणसं अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे मधली माणसं मातोश्रीवर येऊन लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं सांगत आहेत. आम्ही मातोश्रीपर्यंत आलो की आमची पदं कापली जायची, असं आता ते लोक सांगतं आहेत. सत्य तुमच्या बाजूनं असतं तर तुम्ही बंड केलं नसतं. २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलावून मुख्यमंत्रिपद देतो, असं सांगितलं होतं. ते त्यावेळी रडले आणि इतक्या वर्षात शिकलेलं नाटक केलं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनी केली.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.