मुंबई : – सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मागील दोन तीन दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला त्यावरून एकनाथ शिंदे (Eknath shinde) मनसे सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वातावरणात रंगू लागल्या होत्या. त्यावरूनच आता दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘मनसे हा पक्ष नसून डिपॉजिट जप्तीची मशीन आहे’ असे दीपाली यांनी ट्विट करीत म्हंटले आहे.
दीपाली सैय्यद यांनी ट्विट केले आहे की, ” मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता 11 वरून 1 वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही. त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनसे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे “. असा टोला सय्यद यांनी मनसे ला लगावला आहे
एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंना ट्रिंग ट्रिंग
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे घरी आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी फोन वरून दोन वेळा संवाद साधला. त्यावरून एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या मनसे सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.
मात्र एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता असे जरी स्पष्टीकरण समोर आले असले तरी एकनाथ शिंदे यांनी राजकीय दृष्टीकोनातून राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे वारे राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. मात्र दीपाली सैय्यद यांनी एकनाथ शिंदे यांना ‘राजकीय सल्ले घेताना हिशेब बघून घ्या मनसे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे’ असे म्हंटले आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.