मंदिराचे काम पुर्णत्वाकडे आज शहरांतुन कळसासाठी झोळी फेरी

Spread the love


झुंजार प्रतिनिधी :- विशाल महाजन
पारोळा :- येथील गुजराथी गल्लीतील मानाचे नवसाला पावणारे गणपती मंदिरांचे काम हे पुर्णत्वास आले असून या मंदिराच्या मानाच्या कळसासाठी गांवातुन आज झोळी प्रदर्शना होणार आहे .
गेल्या तीन वर्षापासून यामंदिरांचे काम सुरु होते कोरोना वातावरणामुळे कामासही विलंब झाला या मंदिराचे काम हे बन्सी पहाड या दगडात कोरीव काम करण्यात आले असून असे म्हणतात कि मंदिरांचा कळस हा मानाचा कळस मानला जात असल्याने यात संपूर्ण शहरवासियांचा सहभाग असावा या हेतुने कळसासाठी गुजराथी गल्ली, मडक्या मारोती चौक, आझाद चौक, लवण गल्ली, त्रिमुर्ती चौक, जडे गल्ली, बहिरम गल्ली, कासार गणपती मंदिर चौक, बाजार पेठ, गांवहोळी चौक, न.पा चौक, पिरदरवाजा, कजगांव रोड, बस स्टॅड परिसर, हायवे कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहरील शॉपींग, तलाव गल्ली या मार्गने मानाच्या कळस झोळी फेरी काढण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त मदत करून उपस्थित राहण्याचे आव्हान गणपती मंदिर निर्णोद्धार समिती जगदिश गुजरार्थी, सुनिल शहा, मिलिंद नावरकर ,राहुल नांदेडकर निरज गुजरार्थी , बापुराव नावरकर, प्रसाद श्रॉफ सचिन , पंकज गुजरार्थी , राहुल महाजन, मानिकलाल जैस्वाल , बबलु महाजन, रमेश महाजन यांनी केले आहे .

टीम झुंजार