एरंडोल प्रतीनिधि
एरंडोल :- एरंडोल येथील म्हसावद नाक्यावर एकाने माझ्याकडे रागाने काय बघतोस असा जाब विचारला असता. त्यास शिवीगाळ करून डोक्यात सोड्याची बाटली मारल्याची घटना घडली आहे. यात एक इसम जखमी झाला आहे. याबाबत एरंडोल पोलिसांत गुन्हा दखल झाला आहे.
भवानी नगर येथील सुकदेव धमसिंग मोरे (वय ३८) हे दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास म्हसावद नाक्यावर भाजीपाला घेत असताना आरोपी बाल्या विठ्ठल मोरे रा. केवडी पुरा यास माझ्याकडे रागाने काय बघतो असे विचारले असता बाल्या मोरे याने सुकदेव धमसिंग मोरे शिवीगाळ करुन डोक्यावर सोडा बाटली मारुन जखमी केले.
यावेळी स्वतः सुकदेव व त्याचे नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार केले. त्यांनतर एरंडोल पो.स्टे.ला जाऊन फिर्याद दिली. या बाबत एरंडोल पो.स्टे. पूढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ.संतोष चौधरी करीत आहे.
हे वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






