प्रेतांच्या टाळूवरचे लोणी तुम्ही खाता आधी राज्यसभेचा राजीनामा द्या- शिवसेना नेते दीपक केसरकर

Spread the love

चोपडा (प्रतिनिधी गजानन पाटील) गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना दीपक केसरकर यांनी सज्जड दम दिला आहे.आमदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्या राज्यसभेचे अजून पर्यंत तुम्ही शपथ देखील घेतली नाही? आणि या आमदारांना तुम्ही प्रेत म्हणून हिनवता? तुमचा स्वाभिमान जागृत असेल?तर आधी राज्यसभेच्या राजीनामा द्या.

जनतेतून आलेल्या अशा आमदारांच्या आणि प्रेते म्हणून टाळूवरचं लोणी का खाता?असा सवाल दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.शिंदे गटात सामील झालेले सर्व आमदार आपापल्या इच्छने याठिकाणी आले असून, शिवसेनेच्या हितासाठी ते एकत्र आलेले आहेत.

आणि त्यांना मारण्याची भाषा आपण करत असाल,तर ते शोभणार नसून, प्रत्येक आमदाराने आपल्या रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवलेली आहे.याचा विसर आपणास पडला का?अशा शब्दात देखील त्यांनी संजय राऊत यांना खडसावले.

टीम झुंजार