एरंडोल येथे आठवडे बाजार, बस स्टँड व म्हसावद नाका परिसरात पोलिसांची गस्त वाढवा शांतता समितीच्या बैठकीत सदस्याची मागणी

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
येथे बकरी ईद व आगामी येणाऱ्या सणाच्या निमित्ताने एरंडोल पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीचे प्रास्ताविक एपीआय गणेश आहिरे यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव म्हणाले की प्रत्येकाने आपले सण साजरे करताना शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही याचा विचार करून साजरे करावे दुसऱ्यांच्या भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी शांतता व सुव्यवस्था राखून सद्भावना निर्माण करण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.

शहरात वॉट्स अप ग्रुपवर अफवा पसरविणार्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान यावेळी शांतता समितीच्या सदस्यानी आपले मनोगत व्यक्त केले. म्हसावद नाका परिसरात कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी,आठवडे बाजार,बस स्टँड परिसर, तसेच शहरात पोलिसांची गस्त वाढवावी व शहरात भन्नाट दुचाकी चालवणे,कर्कश हॉर्न वाजविणे यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी असे सांगण्यात आले.

या बैठकीस ना माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी किशोर निंबाळकर समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड आणि उर्दू हायस्कूल चे अध्यक्ष जहिरोद्दीन शेख कासम ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव संजय चौधरी कमर अली सय्यद आबा महाजन मानवाधिकार संघटनेचे मोहन चव्हाण जगदीश ठाकूर

एडवोकेट अहमद सय्यद सलीम सर,झाकीर सैय्यद,माजी नगरसेवक एजाज अहमद,बजरंग दलचे भरत महाजन, मनसे चे विशाल सोनार परेश बिर्ला माजी नगरसेवक सुभाष मराठे, शहाबुद्दीन शेख,अनिल आबा चौधरी, आबा महाजन निवृत्त तहसीलदार अरुण माळी,विजय महाजन,प्रसाद दंडवते आदि उपस्थितीत होते आभार पि एस आय शरद बागल यांनी मानले तर परिश्रम हवालदार अनिल पाटील,सुनील लोहार,मिलिंद कुमावत,पंकज पाटील यांनी घेतले

टीम झुंजार