झुंजार प्रतिनिधी:- विशाल महाजन
पारोळा :-तालुक्यातील करमाड येथील माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. लसीकरण शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
१५ ते १८ वयोगटातील. ८० विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी शाळेतील, गावातील इतर शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील जाधव,मुख्याध्यापक आर.एम.पाटील उपस्थित होते.
श्रीमती जे जे मोरे (आरोग्य सेविका)
राकेश शिंपी (आरोग्य सेवक)
उषा पाटील (आशा स्वयंसेविका)
अनिता पाटील (आशा स्वयंसेविका)
श्रीमती माया पाटील (मदतनीस) यांनीपरिश्रमघेतले. उपशिक्षक एस.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे महत्त्व पटवून लस घेण्यास प्रोत्साहित केले. लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत.