साखरपुड्याला गेले लग्न लावून नवरी घेऊन आले

Spread the love

झुंजार शहर प्रतिनिधी

एरंडोल :- येथील वर व चोपडा येथील वधु यांचा साखरपुडा चोपडा येथे पार पडणार होता परंतु दोघा कडील समंज्यास्यामुळे साखर पुड्यातच लग्न लावले गेले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील अशोक कडू महाजन यांचे चिरंजीव स्वप्नील याचे चोपडा येथील दिपक विठ्ठल महाजन यांची कन्या नंदिनी यांचा साखरपुडा चोपडा येथे होणार होता परंतु सद्यपरिस्थिती लक्षात घेता दोघं पक्षा कडील मंडळींच्या समजूतदार पणा मुळे साखर पुड्यातच खर्चिक परंपरांना बगल देऊन समाजाला सकारात्मक बदल स्विकारणारी दिशा देणारा निर्णय घेऊन लग्न लावण्याचा निर्णय घेतला गेला व साखर पुड्यातच लग्न लावलं. सदर निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टीम झुंजार