मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर २४ तासातच नवीन सरकार स्थापन झालं. गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
यानंतर नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत असतानाच मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.
आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षाकडून अद्याप या पदासाठी कुणीही अर्ज दाखल केलेला नाही.
विधानसभेतील भाजप आणि मित्र पक्षांचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड झाली तर ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.