मुंबई : – हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असून त्यांना सरकारने महापुरुष जाहीर केला आहे. महापुरुष हे कोणत्या एका व्यक्तीचे नसतात यामुळे शिवसेना आमची आहे. आता शिवसेना आम्ही आमच्या पद्धतीने वाढवू, अशी प्रतिक्रिया आ गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. ते आमचे म्हणून शिवसेना देखील आमचीच आहे अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या १२ दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी आलेल्या पाटील यांनी आपल्याला शिवसेनेने आजवर भरपूर काही मिळाल्याचेही आवर्जून नमूद केले.
गेल्या २० जूनपासून आधी सुरत, मग गुवाहाटी आणि नंतर गोव्यात असलेल्या आमदारांनी काल रात्री मुंबई गाठली. तर आज विधीमंडळात या आमदारांनी हजेरी लावली यात जळगाव ग्रामीणचे आमदार तथा ठाकरे सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश होता. आज विधीमंडळाचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी एबीपी माझा या वाहिनीने त्यांची खास मुलाखत घेतली.
या मुलाखतीत गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून मी स्वत: शिवसेनेचा झेंडा उचलला आहे. बाळासाहेब ठाकरे हे हे आमच्यासाठी दैवत आहे. ते महापुरूष असल्यामुळे ते कुणा एका परिवाराचे नाहीत. उध्दव ठाकरे हे सुध्दा आमचे नेते होते. मात्र काही घटना घडल्या, ज्या टाळता आल्या असता. आमदारांची नाराजी होती. यातून हा सर्व प्रकार घडला. शिवसेनेने आपल्याला खूप काही दिले. याचमुळे आपण शिंदे यांच्यासोबत जाण्याआधी मातोश्रीवर जाऊन ठाकरे साहेबांना सर्व काही सांगितले. जाणाऱ्या आमदारांशी बोलायला हवे असे देखील सांगितले. मात्र ते न जमल्याने शिंदे सरकार सत्तारूढ झाल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे आमचे असल्याने शिवसेना देखील आमचीच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेला पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सोशल मीडियात आपल्या आधीच्या पोस्ट व्हायरल झाल्या असतांना नंतर देखील पोस्ट व्हायरल होतील असे त्यांनी सांगितले.
- Viral Video: धूमधडाक्यात लग्न पार पडले,सात फेरे झाले नवरदेव नवरीला जबरदस्तीने……. वधू ने दिली वराला लावली जोरदार थप्पड पहा व्हिडिओ
- गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकास एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद.
- ही सासू-सुनेची जोडी रेल्वेत दोघी मिळून करायच्या चोरी आतापर्यंत प्रवाशांचे लांबविले लाखो रुपये अन् दागिने पण अखेर…..
- पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला स्मशानभूमीत.
- Viral Video: पुण्यात महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी! कुणी कपडे फाडले तर कुणी……. पहा व्हिडिओ