कासोदा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेत त्रुटीं ? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख अजीज यांची तक्रार.

Spread the love

प्रतिनिधी राहुल शिंपी

कासोदा : येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम एप्रिल 2018 पासून सुरू असून सदर काम धीम्या गतीने सुरू आहे कासोदा गावाला पंधरा ते वीस दिवसाआड पाणी मिळत आहे. पाईप लाईन गळती व व्हॉल गळती मोठ्या प्रमाणात आहे .सदर योजना निकृष्ट झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख अब्दुल अजिज अब्दुल बारी यांनी अभियंता पाणीपुरवठा विभाग एरंडोल व जीवन प्राधिकरण कार्यालय एरंडोल यांच्याकडे पाणीपुरवठा योजनेत त्रुटी काम निकृष्ट झाल्या बाबत तक्रार केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की धरणातून ज्या ठिकाणाहून पंप आहे त्या ठिकाणी 100 मीटरपर्यंत तीन ते चार फूट पाणी आहे त्या पाण्यातून पंप बंद चालू करण्यासाठी जावे लागते त्या ठिकाणी जाणे येण्यासाठी पूल किंवा एरंडोल पाणीपुरवठा योजनेसाठी जाण्यासाठी व्यवस्था करून मिळावी मोटर जळाली किंवा नादुरुस्त झाली तर त्याचे दुरुस्ती करणारा कसा त्या ठिकाणी जाईल त्यासाठी व्यवस्था करून मिळावी.

रस्त्यावरून पाईपलाईन आलेली आहे त्या ठिकाणचे एअर व्हॉल लिकेज आहेत त्यांची दुरुस्ती करून मिळावी. गावातील पाणी वितरण गर्दी मेन लाईन वर पाणी वाढवण्यासाठी पाच वर्षाची गरज असताना सदर एजन्सीने गावात मेन पाईपलाईन फुटल्यावर संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद करावा लागतो सदर वॉल बसवले गेले असते तर पाईपलाईन फुटल्यावर पाणी वळविण्यासाठी साधन राहिले असते.

पाणीपुरवठ्याच्या मुख्य पाण्याची टाकी जवळ ज्या वॉल ने पाणी वितरण केले जाते त्या वॉल ला 34 आटे असून आज पर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केला नाही फक्त 12 ते 15 आटे खोलून पाणीपुरवठा केलेला आहे जर पूर्ण 34 आटे खोलून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन किती ठिकाणी फुटेल याचा अंदाज करता येणार नाही तसेच पाईपलाईन साठी वापरण्यात आले पाईप अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत.

टीम झुंजार