आंध्र प्रदेशातून आला एक कोटीचा गांजा
जळगाव :- सध्या महाराष्ट्रात गांजा तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका खेडेगावात एलसीबी पथकाची मोठी कारवाई केली आहे.आंध्रपेदशातून जिल्ह्यात विक्रीस आलेला एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडला. नशिराबाद जवळील तीघ्र शिवारातील एका टेकडीवरील एका घरातून हा गांजा पकडला. पोलिस आल्याची कुणकुण लागताच यातील मुख्य तस्कर पळून गेला आहे. मनोज रोहिदास जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल काशिनाथ सुर्यवंशी (वय २५, रा. वाडीशेवाळा, ता. पाचोरा) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास जळगाव एलसीबीच्या पथकाने नशिराबाद जवळील तिघ्रे शिवारातून तब्बल एक कोटी रुपयांचा ८८५ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यातील जळगाव जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे.
भुसावळ तालुक्यातील तिघ्रे गावातील मनोज रोहिदास जाधव हा एका खोलीत मोठ्याप्रमाणात गांजाचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. बकाले यांनी तात्काळ याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघ-चौरे यांच्यासोबत छापा टाकण्यापुर्वी चर्चा करुन मार्गदर्शन घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने बकाले यांनी नशिराबाद पो.स्टेला येऊन छापा टाकण्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद, नशिराबाद यांच्याकडून शासकीय पंच मिळवून निरीक्षक किरणकुमार बकाले व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक तसेच नशिराबाद पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल मोरे व पोलीस अंमलदार यांच्यासह बातमी प्रमाणे तिघ्रे गावात छापा टाकला.
गावातील मनोज रोहीदास जाधव याच्या राहते घराचे मागच्या खोलीत मानवी जीवनास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ गांजा तब्बल ८८५ किलो अंदाजे १ कोटी ६ लाख २० हजार किमतीचा मिळुन आल्याने ते जागीच जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्याठिकाणाहून नामे राहुल काशिनाथ सुर्यवंशी वय-२५ रा. वाडीशेवाडा ता.पाचोरा यास ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई.
कारवाई एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील, सपोनि जालींदर पळे, पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार युनुस शेख ईब्राहीम, वसंत लिंगायत, रवी नरवाडे, हवालदार सुनिल दामोदरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय शामराव पाटील, भगवान पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद अरुण लाडवंजारी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव, विजय चौधरी, दर्शन ढाकणे, सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा, नशिराबाद स्टेचे प्रभारी अधीकारी सपोनि अनिल मोरे, पोउनि राजेंद्र साळुंखे, गजानन देशमुख, किरण बाविस्कर, रविद्रं इंघाटे, सुधिर विसपुते, समाधान पाटील, विजय अहीरे, दिनेश भोई अशांनी संयुक्त रित्या केली आहे.
हे वाचलंत का ?
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.