आत्महत्येचे गूढ कायम,
पूर्णा प्रतिनिधी कलीम:-अगदी आठ महिन्यापूर्वी सर्व नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या विवाह या विवाहानंतर सुखी संसाराची वाटचाल सुरू असताना अचानक दोघांनीही सामुहिक रित्या जीवन संपण्याचा केलेला प्रयत्न हा सर्वांसाठी चटका लावणार असून अशीच ,एक घटना पूर्णा तालुक्यातील पूर्णा ते झिरो फाटा रस्त्यावरील कात्नेश्वर गावात घडली असून शनिवार दिनांक आठ जानेवारीच्या रात्री या गावातील एका पती-पत्नी आपल्या राहत्या घरीच विषारी औषध पिऊन जीवन यात्रा संपली ची घटना घडली असून याप्रकरणी पूर्ण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की कातनेश्वर येथील मयत युवक गंगाधर विश्वनाथ चापके वय वर्ष 25 याचा मागील आठ महिन्यापूर्वी पिंपळगाव कुठे येथील सपना या युवतीशी विवाह संपन्न झाला होता .दरम्यान आठ महिन्यानंतर विवाह झाल्यानंतर विवाहाची सुखी संसाराची वाटचाल सुरू असतानाच दिनांक 8 जानेवारी शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरी या कुटुंबातील गंगाधर विश्वनाथ चापके त्याची पत्नी सपना विश्वनाथ चापके दोघांनी जेवण केले व आपल्या खोलीमध्ये झोपले होते परंतु मध्यरात्री त्यांनी दोघांनी विषारी औषध प्राशन केले दरम्यान सकाळी सपना व गंगाधर झोपेतून उठत नसल्यामुळे जवळच्या नातेवाईकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता दोघीही मृत अवस्थेमध्ये घटनास्थळी आढळून आले दरम्यान या घटनेची माहिती पूर्ण पोलिसांना देण्यात आली .
दिनांक 9 जानेवारी सकाळी आठच्या दरम्यान पूर्णा पोलीस निरीक्षक सुभाष मारकड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे ,अर्जुन रणखांब, विष्णू भोसले ,कांबळे सहकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेऊन पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले.
दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली असून या प्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात कलम 174 दोन ऑब्लिक दोन हजार बावीस प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे गूढ कायमयासंदर्भात बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे यांनी सांगितले की कातनेश्वर येथील घटनेतील आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणामध्ये पुढे चौकशी सुरू आहे दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुळे हे करीत आहेत.