भुसावळ,(प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्टेशनवर (Bhusawal railway station) दिनांक ५ रोजी धावत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिलेचा जीव ड्युटीवर असलेल्या तिकीट चेकिंग स्टाफने (T.C) वाचवीला असून हा संपूर्ण थरारक प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.घडलेल्या प्रकारनंतर रेल्वे प्रशासने धावत्या रेल्वेतून उतरू नये असे अवाहन करण्यात आले आहे.
धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवासात चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण पाहिले आहे.असाच प्रकार काल भुसावळ रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकांवर २२१७७ एक्स्प्रेस गाडी आली होती. या धावत्या रेल्वेतून एका महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेचा तोल जाऊन ती खाली रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भुसावळ रेल्वे विभागाचे TTE कर्मचारी शेख अब्दुल इम्रान माजिद Hd TE BSL यांनी आज ट्रेन क्रमांक 22177 मधून आमच्या बहुमोल प्रवाशाचे प्राण वाचवले.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४