…पण आम्ही मंत्रीपदे सोडली; गुलाबराव पाटील

Spread the love

जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडींना कोण जबाबदार यावरून आता शिवसेना नेते आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून एकोनएकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत

या सर्व प्रकरणावर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला.

एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान विशेष अधिवेशनावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. शदर पवार यांचं एवढं वय झालं आहे तरी देखील ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे देखील आले. मात्र आम्हालाही वाटतं आमचे नेते मतदाससंघात यावेत मात्र तसं कधीही घडल नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार