शिवसेनेला आणखी एक धक्का ; शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात

Spread the love

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच राज्यात उद्धव ठाकरेंना (uddhav thakre)आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असल्याचे समजतेय. यापूर्वी ठाणे महापालिकेतील 66 नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचवेळी शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के देत आहेत. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंना ठाणे महापालिकेतही मोठा झटका बसला. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्याचवेळी कल्याण-डोंबिवलीतून शिवसेनेचे 55 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने शिंदे यांची शिवसेनेवरील पकड मजबूत होत आहे.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली सत्ता गमवावी लागली होती. त्यांच्या जागी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. शिंदे गट सातत्याने पक्षावरील पकड मजबूत करत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आता पक्ष वाचवण्यासाठी मोठा दबाव आहे.

खासदारांबाबत शिवसेनेचा इशारा


त्याचवेळी खासदारांना शिंदे गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी सावध झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती केली. अशी माहिती शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आता एकनाथ शिंदे गटात सामील होऊ शकतात.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार