सी.पी.एस.ओलीम्पियड फाऊंडेशन,न्यू दिल्ली तर्फे अविनाश जावळे सन्मानित.

Spread the love

जळगाव : – जळगाव शहरातील गरीब वस्ती भागातील गरीब,गरजू,होतकरू विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या अविनाश जावळे यांना सी.पी.एस.ओलीम्पियड फाऊंडेशन,न्यू दिल्ली तर्फे उत्कृष्ट कामगिरी साठि सन्मान चिन्ह व प्रमाणात देऊन गौरविण्यात आले ,
अविनाश जावळे हे आर्यन इंटरनॅशनल स्कूल चे मुखध्यापक असून गरीब वस्तीभागातील गरजू विद्यार्थी ज्यांची परिस्थिती हालाकीची असून आधुनिक शिक्षण घेता येत नाही अश्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अविनाश जावळे हे स्व खर्चाने आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देत असतात.

व होतकरू विद्यार्थ्याना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतः मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेत बसवितात अश्याच 10 विद्यार्थ्याना सी.पी.एस. गणित ओलीम्पियड स्पर्धेत सहभागी केले होते त्यापैकी तीन विध्यार्थ्यानी सुवर्ण पदक प्राप्त केले व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात टॉप 100 मध्ये स्थान प्राप्त केले गरजू होतकरु विद्यार्थ्यांचे हे यश बघूनच अविनाश जावळे यांना सी.पी.एस.ओलीम्पियड फाऊंडेशन,न्यू दिल्ली तर्फे सन्मानित करण्यात आले , अविनाश जावळे यांची गरीब,गरजू विद्यार्थ्याना शिकविणारा अवलिया या नावाने शिक्षण क्षेत्रात परिचित आहे .

त्यांच्या या कार्याबद्दल माजी क्रीडाधिकारी किरण जावळे, डॉ.केदार थेपडे, सुनील बाफना, सुनील कुराडे, नीलकंठ गायकवाड, गीता जावळे, क्रीडा शिक्षक धीरज जावळे, श्रीराम पाटील, विश्वनाथ महाजन, राजेश जाधव, सतीश जावळे, शारदा सोनवणे, धनंजय सोनवणे, नकुल सोनवणे, गणेश देसले, सुलतान पटेल आदींनी कौतुक केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार