झुंजार प्रतिनिधी । पारोळा : – तालुक्यातील विचखेडे विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक १० जुलै रोजी पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. शेतकरी विकास पॕनलने चुरसीच्या लढतीत १३ जागांपैकी १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला.
यात निळकंठ पुंडलिक पाटील, रमेश चैत्राम पाटील, बंडु गिरधर पाटील, इच्छाराम हरी चौधरी, समाधान नामदेव पाटील, अशोक साडु माळी, भैय्याराव रामदास माळी, दिलीप रघुनाथ पाटील, विशाल गोकुळ पाटील, माळी रत्नाबाई राजाराम, सुर्यवंशी धापु अभिमन, गढरी प्रविण भिका अशी विजयी उमेदवारांची नावे आहे.
या सर्व विजयी उमेदवारांचे व पॕनलप्रमुख विजय रंगराव निकम यांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दिनकर काशिनाथ पाटील, शरद काशिनाथ पाटील, किरण पाटील सर, सदाशिव पाटील, भैय्यासाहेब पाटील, सचिन माळी, प्रशांत माळी, गौतम सुर्यवंशी, आसाराम भिल व पंडीत भिल यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्या का?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम