पारोळा झुंजार प्रतिनिधी:- आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेली विकासगंगा व मा.आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच मा.आबासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन म्हसवे ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा.साहेबराव विनायक पाटील यांच्यासह म्हसवे, सांगवी, सावखेडे, सार्वे, खेडीडोक, गजानन पळासखेडे, दगडी सबगव्हाण, हिरापुर येथील असंख्य युवक व नागरीकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यासमयी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या बांधवांना शिवबंदन बांधुन शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतला. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, बाजार समितीचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, प्रा. बी.एन.पाटील सर, मधुकरआबा पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे मा.व्हा.चेअरमन जिजाबराव पाटील, चेअरमन गणेश सिताराम पाटील, मा.चेअरमन अरूण पाटील, संचालक राजेंद्र पाटील, नथाबापु पाटील, चेतन पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य दादा पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, मा.शहरप्रमुख बापु मिस्तरी, सुधाकर पाटील, उपशहरप्रमुख भुषण भोई, सावन शिंपी, बाजीराव पाटील, शुभम बोरसे, दिपक सैंदाणे, प्रविण पाटील, दत्तु पाटील, विलास पाटील, विकास पाटील, बापु महाजन सर, शेळावे येथील सुनिल पाटील, बाहुटे येथील अरूण पाटील, सार्वे येथील मनोज पाटील, पंकज मराठे, बापु मराठे, राजु पाटील, ईश्वर पाटील, रमेशआप्पा महाजन यांसह म्हसवे, सांगवी, सावखेडे, सार्वे, खेडीडोक, गजानन पळासखेडे, दगडी सबगव्हाण, हिरापुर या गावांतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ, पत्रकार उपस्थित होते.