खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य
Family Drowned In Oman : – सांगलीतल्या एका कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ओमान समुद्रामध्ये जत मधील तिघे जण वाहून गेले. याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.
येथे सेफ्टी बॅरिअर पार करून काही लोक समुद्राच्या काठावर एन्जॉय करत होते आणि सेल्फी घेत होते.
ओमान (Oman) येथील अल-मुघसाईल बीचवर एकाच कुटुंबातील तब्बल 8 जन समुद्रात वाहून गेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे सेफ्टी बॅरिअर पार करून काही लोक समुद्राच्या काठावर एन्जॉय करत होते आणि सेल्फी घेत होते. याच वेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत हे 8 जण वाहून गेले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेथे उपस्थित असलेले लोक, काही लोकांना वाचवतांनाही दिसत आहेत.
या दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या तीन लोकांना पॅरामेडिक्सने आवश्यक प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. तर समुद्रात वाहून गेलेले काही लोक अद्यापही बेपत्ता आहेत. ओमान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाटेत वाहून गेलेले लोक आशियन कुटुंबातील होते, तर काही जण, हे लोक भारतीय कुटुंबातील असल्याचे सांगत आहेत. मात्र, अद्याप वाहून गेलेल्या लोकांची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
समुद्रात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी काल उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. यासंदर्भात रॉयल ओमान पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली होती. तसे ऑपरेशन संदर्भातील काही फोटोही शेअर केले होते.
यासंदर्भात रॉयल ओमान पोलिसांनी काल एक निवेदनही जारी केले होते. यात, बेपत्ता असलेल्या आशियन कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू आहे. अल मुघसाइल भागात या लोकांचा शोध घेतला जात आहे. हे लोक बिचवरील सेफ्टी फेंस पार करून खडकांजवळ पोहोचले होते. याच वेळी लाटा आल्या आणि त्यांना वाहून घेऊन गेल्या, असे म्हणण्यात आले आहे.
खवळलेल्या समुद्राने क्षणात घेतला तिघांचा बळी

सांगली : – संयुक्त अरब अमिरात येथील ओमान समुद्रामध्ये जत मधील तिघे जण वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन मुले असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा हा प्रकार ओमान इथे घडला आहे.
घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, अंगावर शहारे आणणारे फोटो

जत येथील प्रसिद्ध वकील राजकुमार म्हमाणे यांचे अभियंता असणारे बंधू शशिकांत उर्फ विजय म्हमाणे हे संयुक्त अरब अमिरात येथील येथे एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत असून यामुळे पत्नी व तीन मुलांच्यासह त्या ठिकाणी वास्तव्यास आहे.
रविवारची सुट्टी कुटुंबासाठी ठरली अखेरची

रविवारी ईदची सुट्टी असल्याने ते आपले कुटुंब व मित्रांसमवेत ओमान या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्याबाबतचा जात असतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवून, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता.
एक प्रचंड मोठी लाट आली अन्…

हे कुटुंब ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले असता त्या ठिकाणी प्रचंड अशा लाटा उसळत होत्या. त्याचा व्हिडिओ सुरु असताना एक प्रचंड मोठी लाट आली आणि ज्यामध्ये काहीजण लाटांच्या समवेत समुद्रात ओढले गेले.
वडिलांसह एक मुलगा आणि मुलगी गेली वाहून

यामध्ये शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे तिघे जण वाहून गेले आहेत तर पत्नी सारिका व एक मुलगी बचवल्या गेल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे समुद्र उसळलेला आहे. यात एक मोठी लाट आली आणि या तिघांना घेऊन गेली.
कुटुंबावर दुखाचा डोंगर

याबाबत शशिकांत महामने यांचे बंधू राजाराम महामने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते तातडीने दुबईला गेल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. तर या घटनेबाबत कुटुंबाकडून दूजारो देण्यात आला आहे.
डोळ्यांदेखत पाहिला पती आणि मुलांचा मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या तिघांचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर डोळ्यांदेखत पती आणि मुलांना समुद्राच्या पोटात जाताना पाहिल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
हे वाचलंत का ?
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.