मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजाचे रक्षण करत असताना सततची होणारी धावपळ, दगदग यांचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची निःशुल्क तपासणी आणि वैद्यकीय सल्ला देण्यासाठी हेल्थनोवो या आरोग्यसेवा देणार्या संस्थेकडून दोन दिवसांचे वैद्यकीय शिबीर सामाजिक कर्तव्य भावनेतून वरळी हिल येथील महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी आयोजित केले. या उपक्रमाची व्याप्ती लवकरच वाढवली जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अभय देशपांडे यांनी दिली. या विभागाचे प्रमुख अपर पोलिस आयुक्त विजय पाटील यांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली आहे तसेच शिबिरात स्वतः उपस्थित राहून वैद्यकीय चाचण्या केल्या आणि आपल्या सहकार्यांना प्रोत्साहन दिले.
शिबिरात ४ डॉक्टरांचा सहभाग होता आणि जवळपास २५० पोलिसांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या मानसोपचार तज्ञांनी उपस्थितांचे समुपदेशन केले तसेच त्यांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी महत्वाच्या बाबीदेखील सांगितल्या. अशाप्रकारचे शिबीर आता दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे हेल्थनोवाच्या सहसंस्थापक रिमा सुनित यांनी सांगितले. दरम्यान तपासणी केलेल्यांचा डिजिटल डेटा अभ्यासून त्यांना नियमितपणे आरोग्यविषयक सूचना तसेच टेलिमेडिसिन आणि उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शिबिरात शारिरीक क्षमता, हिमोग्लोबिन, शर्करा, युरिक एसिड, कोलेस्ट्रॉल अशा स्वरुपाच्या सुमारे २० वैद्यकीय चाचण्या करून अहवाल दिला गेला असून वैद्यकीय सल्लादेखील दिला आहे. तसेच सवलतीच्या दरात जेनरिक औषधेदेखील त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली. हेल्थनोवोकडून मोबाईल अॅपदेखील तयार करण्यात आले असून त्याचा वापर करणार्यांसाठी अन्य वैद्यकीय सोयीसुविधांचा देखील उपयोग करून घेता येणार आहे, असेही अभय देशपांडे यांनी सांगितले आहे.
हेल्थनोवो ही जागतिक आरोग्य तज्ञ तसेच व्यावसायिक यांनी स्थापित केलेली आरोग्यसेवा देणारी संस्था आहे. दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या तज्ञांकडून वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याचबरोबर मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती वाढवली गेली आहे. लवकरच अधिकाधिक दर्जेदार वैद्यकीय सेवांची व्याप्ती तळागाळातील नागरिकांपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचा संस्थेच्या सहसंस्थापिका रिमा सुनित यांनी सांगितले आहे.
आपण या बातम्या वाचल्या का?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४