प्रतिनिधी I जळगाव :- जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी आपले वडिल स्व.आबासाहेब कौतिकराव बोरसे यांच्या १६ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळत जळगाव येथील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलच्या प्रकल्पास २१ हजार रुपये देणगी दिली आहे. समाजात स्मृती प्रित्यर्थ अवास्तव आणि अनाठायी खर्च केला जातो, पण प्रतापराव पाटील यांनी अश्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उदात्त भावनेतून मनोबल प्रकल्पाला केलेली मदत समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी अशी आहे.
बुधवारी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात सायंकाळी प्रार्थनेच्या प्रसंगी हा छोटीखानी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना प्रतापराव पाटील असे म्हणाले की आई वडील आपले प्रथम गुरु असतात आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी माझ्या वडिलांची 16 वी पुण्यतिथी आहे.
माझ्या वडिलांनी अत्यंत संघर्षातून आणि कष्टातून आम्हाला सर्व भावंडांना चांगले शिक्षण आणि संस्कार दिलेत. त्यांनी दिलेल्या संस्कारातूनच सामाजिक बांधिलकी जोपासत मनोबलसाठी ही मदत आम्ही केली आहे. मनोबलच्या माध्यमातून आमच्या सारख्यांनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. भविष्यातही आम्ही कायम मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांसोबत असणार आहोत.
या प्रसंगी लेखाधिकारी के. बी. सोनार, संजय पाटील निलेश चौधरी, रुपेश महाजन, कामिनी धांडे, सुनील चौधरी, अनिकेत पवार, इरफान पिंजारी, दीपस्तंभचे संचालक आर डी पाटील, सम्राट माळवदकर आणि मनोबलचे सर्व विदयार्थी उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.