धरणगाव : – चावलखेडा येथील मिठाबाई नारायण पाटील वय ६४ यांना दि.२१/६/२०२२ रोजी रात्रीच्या सुमारास अचानकपणे आरोपी दिपक प्रहलाद पाटील रा. चावलखेडा याने घरात घुसून जबरी लुटमार करत गंभीर दुखापत केल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश धरणगाव कोर्टाने नुकतेच दिले होते.
तदनंतर आरोपीने ॲड. गजानन बी. पाटिल यांचे मार्फत जळगांव सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश सौ. सापत्नेकर मॅडम यांनी ॲड. गजानन पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज मंजुर केला व त्यास मुक्त करण्याचे आदेश नुकतेच पारीत केले.भा. द. वि. कलम ३२९, ३२७,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






