यावल : – सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत अश्यातच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला आहे. तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर नात्यातीलच आरोपीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवार, 13 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी या पोलिसात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. शांतारा मधनसिंग गायकवाड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
घरी कुणी नसताना केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मतिमंद पीडीता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 13 जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेल्यानंतर घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शांतारा मधनसिंग गायकवाड याने पीडीतेला गावातील बकर्यांच्या वाड्यात नेत तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पीडीतेला घेवून यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे..
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा