जळगाव :- सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे सर्वीकळे नद्या नाल्यांना पुर आले आहेत अश्यातच मित्रांसाेबत पोहोण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार केली होती. मात्र, शनिवारी दुपारी तीन वाजता मृतदेह सापडला आहे. सुमित योगेश न्हावी (वय 14, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. योगेशचे वडील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथे राहतात. तो शिक्षण घेण्यासाठी कुसुंबा येथे मामाकडे राहत होता.
घटना अशी की, शुक्रवारी दुपारी सुमित काही मित्रांसोबत उजाड कुसुंबा भागात एका खदानीत पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी गाळात अडकल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना पाहुन त्याच्यासोबत असलेले मित्र भांबावले. ते सर्व घरी निघुन आले. कुणीही ही घटना गावात सांगितली नाही. परिणामी सुमितचे कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत राहिले. या प्रकरणी त्याचे मामा अशोक सुभाष सोनवणे यांनी शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
खदानीजवळ कपडे सापडले
दरम्यान आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही लोकांना खदानीजवळ सुमितचे कपडे आढळुन आले त्यानंतर खळबळ उडाली. सुमित पाण्यात बुडाला असल्याची माहिती समोर आली. यांनतर पोलिस पाटील राधेश्याम चौधरी व मामा अशोक सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोध घेतला असता सुमीतचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळा धाव घेऊन काही घातपात आहे का? याची चौकशी करुन पाहणी केली. गफूर तडवी व सिध्देश्वर डापकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. या संदर्भात कुटुंबीयांची तक्रार नसल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुमित हा कुसुंबा गावात आई व लहान भाऊ राज यांच्या सोबत राहत होता. त्याची आई चटई कंपनीत कामाला जाते. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






