एस टी बस अपघातावर आ.गुलाबराव पाटील यांचे लक्ष दोन्ही जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात; शासनातर्फे सर्वतोपरी मदत

Spread the love

मुंबई/जळगाव दि. १८ (प्रतिनिधी ) : अमळनेर आगाराच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त येताच माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ जळगाव आणि खरगोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्य करण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानुसार मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातातील मदतकार्यावरमाजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून असून अपघातग्रस्त आणि त्यांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज दि. १८ जुलै, २०२२ रोजी सकाळी ०७.३० वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे १०.०० ते १०.१५ च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळली असून या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवासी नदीत वाहून गेल्याने मृताचा आकडा वाढण्याची भिती आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती येताच, माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. तसेच त्यांनी याबाबत जळगाव आणि खरगोण जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्याबाबतची माहिती जाणून घेत याला गती देण्याचे निर्देश दिलेत.

राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली असून जखमींवर उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडींवर माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अपघातातील मृतांचे वारस आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार