रावेर :- जळगाव जिल्ह्यातील सुखी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात 9 पर्यटक अडकले होते. त्यांची मोठ्या शर्थीने प्रशासनाने सुटका केली आहे.
स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे.जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बचाव कार्यासाठी तात्काळ संबंधित यंत्रणेला कळविण्याची विनंती पाटबंधारे विभागाचे सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी आपत्ती व्यवस्थापनाला केली आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली आहे.
धुळे येथील SDRF चे पथक बचावकार्यासाठी मागविण्यासाठी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आले आहे. स्थानिक आमदार शिरीष चौधरी रावेर तहसील टीम, सावदा पोलीस स्टेशन टीम, प्रांत फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी, अनिल नारखेडे यांनी सहकार्य केले.
धरणाच्या सांडव्याच्या खाली नदी पात्रात अडकलेली व सुटका झालेली व्यक्ती
- विष्णू दिलीप कोलते (17)
- आकाश रमेश धांडे ( 25 )
- जितेंद्र शत्रुघ्न कूंडक ( 30 )
- मुकेश श्रीराम धांडे (19)
- मनोज रमेश सोनावणे ( 28 )
- लखन प्रकाश सोनावणे ( 25 )
- पियूष मिलिंद भालेराव ( 22 )
- गणेशसिंग पोपट मोरे (28),
- सर्व रा मुक्ताईनगर
वाचविणारे स्थानिक
- इम्रान शहा रतन शहा (रा. पाल )
- संतोष दरबार राठोड (रा. पाल )
- रतन भंगी पावरा (रा. गारखेडा)
- तारासिंग रेवलसिंग पावरा (रा. गारबर्डी)
- सिद्धार्थ गुलजार भिल
- अतुल प्रकाश कोळी (20)
हे पण वाचा.
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.
- अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध,प्रेयसी लग्नासाठी पळून आली प्रियकराकडे, पण त्याने दिला धोका अन्…. एक SMS अन् 6 महिन्यांनी अंगावर काटा आणणारी कहाणी.
- धरणगाव तालुक्यात बाबाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू,सर्व नातेवाईक जमले,अचानक ‘तेच वृद्ध’ घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क.
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.