मुले अभ्यास करत असताना ‎पाठीमागे‎ ‎पलंगावर‎ ‎झाेपलेल्या‎ ‎वडिलांनी‎ उचलले टोकाचे पाउल

Spread the love

जळगाव‎ :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगावात एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुले अभ्यास करत असताना ‎दुसरीकडे‎ ‎मुलांच्या‎ ‎पाठीमागे‎ ‎ पलंगावर‎ ‎ झाेपलेल्या‎ ‎ त्यांच्या‎ ‎ वडिलांनी‎ काही क्षणातच पंख्याला रुमाल‎ बांधून गळफास घेत आत्महत्या‎ केली. समाधान रामदास सुरवाडे (वय‎ ४५, रा. काळेनगर, शिवाजीनगर)‎ असे मृताचे नाव आहे. दरम्यान, भेदरलेल्या मुलांनी‎ घराबाहेर जाऊन ही घटना‎ परिसरातील नागरिकांना सांगितली.‎ आजारपणाला कंटाळून त्यांनी‎ आत्महत्या केल्याची शक्यता‎ नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

सुरवाडे यांना‎ दम्याचा आजार हाेता. त्यामुळे ते‎ प्रचंड त्रस्त झाले होते. सोमवारी‎ दुपारी त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस‎ बाहेरून काहीतरी खाद्यपदार्थ‎ आणण्यासाठी पाठवले. यावेळी‎ घरात त्यांची मुले प्रेम व करण हे‎ दाेघे अभ्यास करीत बसले होते.‎ त्यांच्या पाठीमागे सुरवाडे हे‎ पलंगावर झोपले होते. काही‎ क्षणातच सुरवाडे यांनी पंख्याला‎ रुमाल बांधून गळफास घेत‎ आत्महत्या केली. यावेळी झालेल्या‎ आवाजामुळे दोन्ही मुलांच्या लक्षात‎ हा प्रकार आला. वडिलांनी‎ गळफास घेतल्याचे दृश्य पाहून दोघे‎ मुले भेदरली, घराबाहेर येऊन त्यांनी‎ परिसरातील नागरिकांना ही बाब‎ सांगितली. शिवसेनेचे शिवाजीनगर‎ विभागप्रमुख विजय बांदल‎ यांच्यासह काही लोकांनी सुरवाडे‎ यांच्या घरी धाव घेत पोलिसांना‎ माहिती दिली.

त्यानंतर शहर पोलिस‎ ठाण्याचे कर्मचारी ओमप्रकाश‎ सोनी, नितीन अत्तरदे व दिनेश‎ कंखरे यांनी घटनास्थळी येऊन‎ पंचनामा केला. दुपारी ३ वाजता‎ मृतदेह शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालयात‎ आणला होता. यावेळी नातेवाइकांनी‎ अाक्राेश केला. मृत सुरवाडे यांनी‎ आजारपणाला कंटाळून आत्महत्या‎ केल्याची माहिती नातेवाइकांनी‎ दिली आहे. मृत सुरवाडे यांच्या‎ पश्चात पत्नी राधिका, आई, मुले‎ भारत, प्रेम व करण असा परिवार‎ आहे. या प्रकरणी शहर पोलिस‎ ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎ करण्यात आली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार