मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सामाजिक कार्यकर्ता समनव्य समिती आयोजित कार्यकर्ता मेळावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी हक्क पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात जनता केंद्र मुबंई सेंट्रल या ठिकाणी पार पडला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाकवी वामनदादा कर्डक कट्टा आयोजित करण्यात आला होता. लोक शाहीर वामनदादा कर्डक यांचे नातू साहित्यिक संदेश कर्डक, गायिका ज्योती चौहान, मैत्री संस्थेचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते – गायक सुरज भोईर यांनी प्रबोधनपर गीत/कविता सादर केल्या आणि उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमासाठी माजी खासदार व ज्येष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, कायदेतज्ज्ञ तसेच भिमराज की बेटीच्या अध्यक्षा अॅड. सोनिया गजभिये, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे रेडिओलाजिस्ट डॉ. मनोहर कांबळे, साहित्यिक तसेच समाजसेवक डॉ. शांताराम कारंडे, नृत्य सम्राट डॉ. सागर नटराज, अभिनेत्री-निर्मात्या पद्मजा खटावकर, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, तेजस्विनी महिला आघाडीच्या, साताराच्या अध्यक्षा संगीता शिंदे आणि कार्यक्रमाचे अायोजक सुरज भोईर उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी हक्क पुरस्कार २०२२” सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक, प्राणीमित्र, रुग्णमित्र संतोष भोईर यांचा विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
महाराष्ट्र भरातून चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. संविधान मजबुत करण्यासाठी सर्व उपस्थितांनी सामूहिक शपथ घेतली. संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी सर्वांना संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण लोकनेता युट्युब वाहिनीवरून करण्यात आले. त्यासाठी संपादक विकास चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय केदासे, कपिल श्रीरसागर, गजानन भात्रे, विजय गोडबोले, सीमा परिहार, कल्पना सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४