मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन 20 दिवस उलटून गेले तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी शिंदे-भाजपच्या आमदारांकडून आमदार प्रयत्न करत आहे. मात्र अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एक आमदाराला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय.या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
एवढंच नाही तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. मागील काही दिवसांनी हे चार भामट्यांनी आमदारांना गाठून मंत्रिमंडळात स्थान मिळवून देतो असे आमिष दाखवून 3 आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या भामट्यांनी आपण दिल्लीतून आल्याचे सांगितलं आणि वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे, अशी थापही मारली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही, या आमदारांना फोन करून मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल र 100 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीच केली. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते.
मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते.
याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने रोपीला पकडले. या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकार फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
हेहि वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.