एरंडोल येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास आमदार चिमणराव पाटील यांची भेट.

Spread the love

शालेय विद्यार्थ्यांशी केली लसीकरणाबाबत चर्चा.

प्रतिनिधी। एरंडोल:-एरंडोल दिनांक 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरणा सुरुवात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना लसीकरण फक्त ग्रामीण रुग्णालय येथेच करण्यात येत होते. सात जानेवारीपासून तालुक्यातील तीनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

काबरे महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांना लसीकरण प्रसंगी आमदार चिमणराव पाटील प्रांताधिकारी विनय गोसावी,डॉ कैलास पाटील डॉ. फिरोज शेख, शालिग्राम गायकवाड, किशोर निंबाळकर, अनिल महाजन.

त्या अनुषंगाने एरंडोल शहरात दिनांक 10 जानेवारी पासून रा.ती. काबरे महाविद्यालयात आज पासून सुरू करण्यात आली. या लसीकरण केंद्रास तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती अनिल महाजन या मान्यवरांनी काबरे महाविद्यालयात सुरू असलेल्या लसीकरणाचे भेट दिली.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना न घाबरता लस घ्यावी व आपल्या आई वडिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्यास त्यांनासुद्धा सांगून लस घेण्यासाठी आग्रह करावे ,असे सांगितले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानधने यांना सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे असे सांगितले.

रा. ति. काबरे महाविद्यालयात इयत्ता नववी मधील 324 विद्यार्थी इयत्ता दहावी मधील 280 अकरावी मधील 66 व बारावी मधील 45 असे एकूण 715 विद्यार्थी आहेत त्यापैकी आज 102 विद्यार्थी व 81 विद्यार्थिनी असे एकूण 183 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे जगदीश पाटील, पुनम धनगर, सरला गढरी, सुरेखा परदेशी यांचेसह काबरे विद्यालयातील शिक्षक वृंद परिश्रम घेत होते.फोटो ओळ:- काबरे महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांना लसीकरण प्रसंगी आमदार चिमणराव पाटील प्रांताधिकारी विनय गोसावी,डॉ कैलास पाटील डॉ. फिरोज शेख, शालिग्राम गायकवाड, किशोर निंबाळकर, अनिल महाजन

टीम झुंजार