औरंगाबादेतून बिस्कीटांनी भरलेला कंटेनर चोरला: जळगावातील दोघांना अटक.

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे अश्यातच औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाड येथील रहिवासी राजेंद्र बाबुराव कचरे यांचा ट्रान्सपार्टचा व्यवसाय आहे. त्यांचा मालकीचा टाटा कंटेनर क्रमांक (एमएच 20 इजी 4287) ट्रक मध्ये 16 लाख रूपये किंमतीचा बिस्कीटांचा माल भरण्यात आलेला होता. शनिवारी 16 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातून चोरून नेला होता. याप्रकरणी संदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा पोलिस ठाण्यात ट्रक मालक राजेंद्र कचरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघे पोलिसांच्या ताब्यात

या गुन्ह्यातील संशयित आरोपी यांनी कंटेनर जळगाव शहरात आणल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिखरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात शोध पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस हवालदार सचिन मुंढे, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, योगेश बारी यांनी कंटेनर क्रमांक (एमएच 20 इजी 4287) याला मुद्देमालासह हस्तगत करून संशयित आरोपी यासीन खान मासूम खान मुलतानी आणि जाकीर अमिन मुलतानी दोन्ही रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेतले. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी 21 जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार