Aaditya Thackeray: गेली अडीच वर्षे मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना उद्धव ठाकरे साहेबांना काम करताना पाहिलं आहे. उद्धव साहेब दिवसातील २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे. यावरुन काहीवेळा मी आईकडे जाऊन भांडायचोही. मला हे त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण उद्धव ठाकरे सतत मिटिंगमध्ये, कामात व्यग्र असायचे.
मुंबई :- गेल्या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी जवळून पाहिले आहे. ते २४ तास जनतेसाठी काम करायचे. त्यामुळे मी कधीकधी आईकडे जाऊनही भांडायचो, असे वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले. शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते. उद्धव ठाकरे आम्हाला भेट देत नाही, हा त्यांचा प्रमुख आक्षेप होता. आदित्य ठाकरे यांनी नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत हे सर्व आरोप खोडून काढले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दिवस-रात्र जनतेसाठी कशाप्रकारे काम करायचे, हे आदित्य ठाकरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
गेली अडीच वर्षे मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना उद्धव ठाकरे साहेबांना काम करताना पाहिलं आहे. उद्धव साहेब दिवसातील २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे. यावरुन काहीवेळा मी आईकडे जाऊन भांडायचोही. मला हे त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण उद्धव ठाकरे सतत मिटिंगमध्ये, कामात व्यग्र असायचे. मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचा जायचो तेव्हा ते म्हणायाचे की, ‘कामाचं बोल, राज्याबद्दल बोल’, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दिवाळीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. तेव्हा मला एका परिषदेसाठी स्कॉटलंडला जायचे होते. मी त्यांना विचारले की, बाबा तुमचं ऑपरेशन आहे, मी स्कॉटलंडला जाऊ की नको? त्यावर उद्धव साहेब म्हणाले की, आदित्य माझी चिंता करु नकोस. तू महाराष्ट्राचा मंत्री आहेस, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
‘गद्दारी का केली, याचं उत्तर द्या’; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल
आदित्य ठाकरे यांनी या सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. नेमकं काय घडलं असेल, गद्दारी कशामुळे झाली असेल? गेल्या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं होतं. देशभरात त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात होतं. मग असं नेमकं काय घडलं की, या आमदारांनी गद्दारी केली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला, मेहनत केली. मग बंडखोर आमदारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर का खुपसला? काहीही आरोप करायचे. पण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची ती लायकी नसते, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला.
हेही वाचा –
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.