शिर्डीतील साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवार/रविवार ऐवजी इतर दिवशी सुट्टी द्यावी.

Spread the love

शिर्डी (प्रतिनिधी) –

जितेश लोकचंदानी यांची शासनाकडे मागणी.

शिर्डी (प्रतिनिधी) -शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांना शनिवार रविवार या साईभक्तांच्या शिर्डीतील गर्दी काळात शासकीय सुट्टी ऐवजी इतर दिवशी सुट्टी‌ घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , प्रधान सचिव विधी व न्याय मंत्रालय, प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई व संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,साईबाबांमुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून शिर्डी येथे साईभक्तांची दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शनिवार, रविवार या सुट्टी काळात साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत होत असते .मात्र याच दिवशी शनिवार-रविवारी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्यकार्यकारी अधिकारी हे अनेक वेळा सुट्टीवर असतात. रविवारी शासकीय सुट्टी असली तरी शिर्डीत मात्र संस्थांनचे अनेक विभाग सुरू असतात आणि भाविकांची याच दिवशी जास्त रेलचेल असते. प्रसादालय,निवासस्थाने,दर्शनरांग,सुरक्षा विभाग,आरोग्य विभाग व हॉस्पिटल हे सर्व रविवारीही सुरू असतात.

त्यामुळे संस्थांनच्या कामकाजावर शनिवार-रविवारी ह्या सुट्टीच्या गर्दी काळात व्यवस्थापनचे नियोजन, नियंत्रण असावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी या दिवशी ड्युटीवर असणे गरजेचे असताना रविवारी मात्र त्यांना शासकीय सुट्टी असल्याकारणाने ते सुट्टीवर असतात. शिर्डीत नेहमीच गर्दी तर आहेच परंतु शनिवार व रविवार रोजी गर्दी जादा होत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी रविवारी सुट्टी घेऊ नये .त्यांनी इतर दिवशी शासकीय सुट्टी घ्यावी त्यासाठी आपण साईबाबा संस्थान ला तसे सूचना कराव्यात.जेणेकरून भाविकांच्या काही अडचणी असल्यास मुख्य वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने त्या अडचणी सोडवताना उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा नसते त्यामुळे त्यांची मोठी अडचण होऊन जाते तसेच ह्या अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळ मर्यादा ठरवून द्यावी.

व या अधिकाऱ्यांना गुरुवार शनिवार रविवार या शिर्डीतील साईभक्तांच्या गर्दी काळात शासकीय सुट्टी घेण्याऐवजी इतर दिवशी या शासकीय सुट्ट्या घेण्यासंदर्भात सूचना करावी.अशी मागणी दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी या पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. असे दिलेले निवेदनात म्हटले आहे.

टीम झुंजार