जळगाव : शासनाकडुन आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC प्रमाणीकरण केलेले नाही, अशा लाभार्थ्यांकरीता e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यास दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पात्र लाभार्थी शेतकरी यांना e-KYC करण्यासाठी पुढीलप्रमाणे OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या लाभार्थी शेतकरी यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील e-KYC या टॅब मधुन OTP द्वारे लाभार्थींना स्वतः e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल.
तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (CSC) सुद्धा बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रांवर बायोमॅट्रिक पद्धतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15/- मात्र निश्चित करण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै अखेरपर्यंत आपले e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
#आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.