सोयगाव,दि.२५..सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी दि.२८ पंचायत समितीच्या सभागृहात विशेष भूसाम्पंदन अधिकारी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
त्यामुळे सोयगावात राजकीय वातावरण तापले आहे.सोयगाव पंचायत समितीच्या आमखेडा, फर्दापूर, सावळदबारा,बनोटी, निंबायती,आणि गोंदेगाव या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे.त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून
तहसीलदार रमेश जसवंत,नायब तहसीलदार हेमंत तायडे,विठ्ठल जाधव,आदी सोडतीची प्रक्रिया राबविणार आहे.सोयगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणताही बदल झालेला नसून सोयगाव शहर वगळता जिल्हा परिषदेचे तीन गट,व सहा गणांसाठी सोयगाव तालुक्यात निवडणुका होवू घातल्या आहे.यासाठी गुरुवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे.
चौकट
जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी नव्याने नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने सोयगाव तालुक्यात सहा गनांपैकी दोन गण नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी आरक्षित होण्याची शक्यता आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






