लिंबे जळगाव वि.का. सह.संस्थांच्या अध्यक्षपदी कारभारी पाटील गोलांडे तर उपाध्यक्षपदी शेख जहिर शेख यासीन यांची बिनविरोध निवड.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद :-
लिंबे जळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची २०२२-२०२७ या कालावधीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक अध्याक्षी अधिकारी तथा सहकार अधिकारी श्री गावढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज आल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी कारभारी गोलांडे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शेख जहिर शेख यासीन यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गावंढे यांनी जाहीर केले

त्यांना संस्थेचे सचिव बाबासाहेब पाठे यांनी सहकार्य केले त्याच बरोबर संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांमध्ये सर्व श्री माजी चेअरमन रामेश्वर गवळी, माजी चेअरमन सुभाष पाटील जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, माजी सरपंच काकासाहेब दाणे, विद्यमान सरपंच सय्यद अनिस सय्यद आमीर, उद्योजक संजय देसले, एकनाथ फरकांडे, श्रीमती अलका बाई हाडुळे, श्रीमती सुफियाबी रज्जाक, यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक कारभारी पाटील जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युनुस पटेल, सर्कल अध्यक्ष सईदबाबा पठाण,ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे,शेख साडु शेख रहिम,सय्यद हसन बाबा, अशोक हाडुळे, शेषराव जाधव, नारायण जाधव,कुष्णा पाटील गोलांडे मुजमिल,शेख शकील शेख यासीन, शेख रऊफ गुलाब,भाऊसाहेब पडघण, अफरोज सय्यद,शेख अनिस रज्जाक

त्याचप्रमाणे गावातील युवा, महिला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा तालुका अध्यक्ष शेख युनुस पटेल, लिंबे जळगाव सर्कल अध्यक्ष सईदबाबा पठाण यांनी शाल पुष्पहार घालून सत्कार केला सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देसले यांनी केले तर संस्थेचे सचिव बाबासाहेब पाठे यांनी सर्वांचे आभार मानले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार