रावेर :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच रावेर तालुक्यातील एका 35 वर्षीय विवाहितेला दुचाकीवरून अंतुर्ली येथे सोडण्याच्या बहाण्याने दोघा आरोपींनी शेतात नेवून विवाहितेवर अतिप्रसंग करीत बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता रावेर-सावदा रोडवरील सुकेद सनांसे यांच्या शेतात घडला. या प्रकरणी निंभोरा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय विवाहितेला आरोपी चिंतामण विक्रम बारेला (नाचणखेडा, ता.बर्हाणपूर) व राजेश मुकेश बारेला (ईटारीया, ता.झिरण्या, खरगोन) यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अंतुर्ली येथे सोडण्याच्या बहाण्याने विना क्रमांकाच्या दुचाकीवर बसवले मात्र काही वेळानंतर सावदा रस्त्यावरील सुकदेव सनांसे यांच्या शेतात महिलेला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने सुटका करीत निंभोरा पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तपास हवालदार विकास कोल्हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






