सोयगाव,दि.२६..राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विधानसभेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची परवानगी द्यावी व मी परत निवडून येतो कि नाही हे संजय रावूत यांनीच बघावे असे थेट आव्हान आमदार अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी सोयगाव येथे खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
संजय राऊत हा माणूस माझ्याच मतावर खासदार झाला अन मलाच आव्हान देतोय कि पुन्हा निवडून कसे येता ते बघू मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर मी संजय राऊत यांचे आव्हान स्वीकारायला तयार आहे असेही त्यांनी सांगितले.मंगळवारी आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या नियोजन बैठकीला सोयगावला आले होते.
आमदार अब्दुल सत्तार यांचा सोयगाव तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.सोयगाव-सिल्लोड तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची पुष्टी सत्तार यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सिल्लोड दौऱ्यावर येत आहे त्यासाठी त्यांनी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांच्या विकासासाठी दिलेल्या निधीबाबत आभार व्यक्त करण्यासाठी सिल्लोडला या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.यावेळी केशवराव तायडे आबासाहेब काळे, अॅड.योगेश पाटील, राजू दुतोंडे, नितीन बोरसे, धरमसिंग चव्हाण, आभार संतोष बोडखे यांनी मानले.
आपण या बातम्या वाचल्यात का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






