तांबोळा येथे श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली….

Spread the love


लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील तांबोळा येथे श्री संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला, यावेळी माळी समाज बांधवांकडून श्री संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे भजन- पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानंतर समाज बांधवांकडून पुण्यतिथी निमित्त गावकऱ्यांमध्ये प्रसाद वाटण्यात आला.


संत सावता माळी (जन्म : इ.स. १२५०; समाधी : इ.स. १२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय.दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते.ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते.शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत.पंढरीची वारी करीत असत.त्यांचा विवाह ही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला.या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय.दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले.
त्यांनी आपल्या व्यवसायालाच विठ्ठलाच्या सेवेचा भाग म्हणून निवडले होते.

  • कांदा-मुळा-भाजी ।
    अवघीं विठाई माझी ॥१॥
    लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
    अवघा झाला माझा हरीं ॥२॥
  • ऊस-गाजर-रातळू ।
    अवघा झालासें गोपाळू ॥३॥
    मोट-नाडा-विहींर-दोरी
    अवघीं व्यापिली पंढरी
    सावता म्हणें केला मळा ।
    विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५


सावता माळी यांनी सेना न्हावी,नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार,शब्द अभंगांत वापरले आहेत.तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची,नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली.


श्री संत सावता माळी प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी याही वर्षी पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्ती भावमय वातावरणात साजरी करण्यात आली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार