एरंडोल (प्रतिनिधी) :- राज्यात नुकत्याच घडलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच शिवसेनेचे पक्ष संघटन अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मुंबई येथील शिवसेना भवनात बैठकांचा सपाटा सुरू आहे.
येथील युवासेनाच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन एरंडोल विधानसभा मतदार संघातील स्थिती विषयी चर्चा केली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत आहेत. याच अनुषंगाने काल दि. २६ जुलै रोजी शिवसेना भवन येथे युवासेनेची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली. यावेळी जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मतदार संघातील स्थिती विषयी चर्चा केली.
एरंडोल, तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो ढासळू देऊ नका अशी साद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घातली. एरंडोल तालुक्यातील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
सदर बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या सूचनेनुसार एरंडोल तालुक्यातून युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील, शहरप्रमुख अतुल महाजन, शहर समन्वयक अमोल भावसार, देवेन पाटील,प्रसाद महाजन, नितीन बोरसे, राजेश महाजन, आकाश निंबाळकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






