पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीला अमानुष मारहाण, संचालक रात्री खोलीत गेला आणि…

Spread the love

Aurangaba​d News : कुठल्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाहीत. पण आता पोलीस क्षेत्रातही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. कारण, औरंगाबादमध्ये मैदानावर उशीरा पोहोचल्यामुळे संचालकाने तरुणीसोबत असं काही केलं की काळजाचा ठोका चुकेल.

औरंगाबाद : – राज्यात महिला अत्याचाऱ्या घटना वारंवार वाढतच चालल्या आहेत. अशात औरंगाबादमध्ये सगळ्यांनाच हादरवणारी घटना समोर आली आहे. इथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय युवतीला अगोदर मारहाण केली व नंतर रात्री तिच्या खोलीत जाऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील हडको भागात असलेल्या स्पेशल फोर्स अकॅडमित समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ राठोड (रा.हडको, औरंगाबाद) असं आरोपी संस्थाचालकांचं नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हडको परिसरात स्पेशल फोर्स अकॅडमी आहे. या अकॅडमीत सिल्लोड तालुक्यातील १७ वर्षीय युवतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास प्रवेश घेतला होता. यानंतर ६ व ७ जुलै रोजी तीला मैदानात येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ‘तू आज मैदानावर का आली नाही’ असे म्हणत तिचा हात धरून चार ते पाच वेळा कानशिलात मारले.

संस्थाचालक एवढ्यावरच थांबला नाही. यानंतर रात्री जबरदस्तीने पीडित युवतीच्या खोलीत घुसून तिचा विनयभंग केला. जेव्हा युवतीने विरोध केला तेव्हा खोलीतील झाडूने मारहाण केली. भेदरलेल्या तरुणीने ही घटना नातेवाईकांना सांगितल्यानंतर पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला असून पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार