दुर्दैवी : कोरोनाने पती हिरावला, उपासमारीमुळे आईने पोटच्या मुलांना विक्रीला काढले !

Spread the love

अमळनेर :- आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने एक महिला ही आपल्या अपत्याला विक्री करण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे.

कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले तथा उघड्यावर आले. अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या पतीचा देखील कोरोनात मृत्यू झाला. तिला सात मुलं असल्याने त्यांचा सांभाळ करणे तिला कठीण जात होते. यामुळे तिने चक्क पोटाच्या मुलांना विक्रीला काढले. दरम्यान, पोलिसांनी त्या पोटाच्या मुलांना विक्री करणाऱ्या आईला ताब्यात घेतले आहे.

शहरातील गांधीलपुरा भागात एक महिला आपल्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना २८ जुलै रोजी सकाळी मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस नजमा पिंजारी, दीपक माळी आणि रवींद्र पाटील यांना पाठविले. या पथकाला संबंधीत महिला आढळून आल्याने तिला पोलीस स्थानकात नेण्यात आले.

हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) असे त्या महिलेचे नाव आहे. या अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात त्यांच्या पोटाच्या मुलानां विक्री करत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासासाठी पो. कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील यांचे पथक रवाना झाले आणि सदर महिलेचा शोध घेत तिला गाठले. माहिती घेवून तिचे जवळील ७ मुलांसह पोलीस स्टेशनला हजर केले. यावेळी स्वतः हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) व सोबत ३ मुली, ४ मुले यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

सदर महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत अधिक विचारपुस करुन चौकशी केली असता सदर मुले व मुली त्या महिलेचे अपत्य असून तिचे पती कोरोना काळात कोविड आजाराने मयत झाले. यामुळेच तिच्‍याकडे स्‍वतःचे व मुलांच्‍या उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती मुलांना इच्छुक लोकांना विक्री करत होती.

दरम्यान, बालकांना विकणे आणि विकत घेणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा असून कुणी असे करू नये. असे करतांना आढळून आल्यास याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

भविष्यात मुलांना विकुन टाकण्याची शक्यता असल्याने तिच्‍या ताब्यातील ३ मुली व ४ मुले व तिच्‍या पालन पोषणकरीता सदर बालकांची काळजी घेण्यासाठी व त्या बालकांना संरक्षण मिळणेकरीता त्यांना बालकल्याण समिती जळगाव येथे हजर करून महिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. सदरची कारवाईवेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउपनि नरसिंग वाघ, पो.कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार