२० जनावरांची चोरी करणारी ‘अर्धा डझनी’ गँग जाळ्यात!
महत्त्वाचे : –
- सिल्लोडच्या सहा जणांना अटक : चाळीसगाव पोलिसांची कामगिरी, अनेक गुन्ह्यांची होणार उकल
- चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केला गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- आरोपींना घेण्यासाठी जात असताना सिल्लोडजवळ झाला अपघात
चाळीसगाव : – गुरे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी सिल्लोडकडे जात असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे वाहन पूलावरुन खाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. विशेष बाब म्हणजे, अपघातानंतरही पोलीस थांबले नाहीत, ‘ड्युटी फर्स्ट’ असे म्हणत जखमी अवस्थेत पोलीस सिल्लोडला पोहचले व गुरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. अपघात एवढा भीषण होता ती यात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. मात्र, यातही सुदैवाने वाहनातील तीनही कर्मचारी बचावले. कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला असून दुखापत झाली आहे.
गाडी पूलावरुन कोसळल, सुदैवाने सर्व बचावले
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुरे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हे सिल्लोड येथील असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक नितीन आमोदकर, पोलीस नाईक गोवर्धन बोरसे, पोलीस नाईक संदीप पाटील या कर्मचाऱ्यांना रवाना केले. कर्मचारी खाजगी वाहनाने सिल्लोड येथे जात असताना गाडी पूलावरुन कोसळून वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. त्यात सुदैवाने ते वाचले परंतु वाहनातील कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला तरी सुद्धा जखमी अवस्थेत तिघेही कर्मचाऱ्यांनी सिल्लोड येथे जाऊन गुरे चोरी करणाऱ्या टोळीला जेरंबद केलं.
टोळीने चाळीसगाव तालुक्यात चोरली तब्बल २० गुरे
शेख इम्रान शेख ईसा (वय ३०), शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान (वय २६) शेख उमेर शेख ताहीर (वय २७) सर्फराज बिलाल खाटीक (वय २२) शेख सत्तार शेख ईसा (वय २४) शेख इरफान शेख ईसा (वय ३३) सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरंगाबाद या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांनी चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथून ६, वाघळी शिवार येथून ४, वडाळी आणि न्हावे येथून ३, जावळे येथून २ रोकडे फाटा येथून २ तसेच पिपंळवाड निकुंभ येथून ३ जनावरे अशी एकूण २० जनावरे सुमारे चोरी करुन नेल्याचं उघडकीस आलं आहे. संशयितांकडून ८ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे. गुरे चोरी केल्यानंतर सदर गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या चोरींची कबुली
खेर्डे येथून ६, वाघळी शिवारातील ४ वडाळी वडाळी व न्हावे येथील ३, जावळे येथील २ रोकडे फाटा येथील २ व पिंपळवाड निकुंभ येथील ३ जनावरे अशी२० जनावरे चोरी करुन नेल्याचे अद्याप पावेतो उघडकीस आले आहे. या चोरट्यांकसून ८ हजार रुपये रोख व ५ लाख रुपयांची महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे.
मालेगाव व सिल्लोड न्यायचे गुरे….
या आरोपींनी नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील गुरे चोरी केल्याची कबुली दिली. गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव लावायचे. ही कारवाई पोलीस निरीक्षक, संजय ठेगें, सहायक निरीक्षक रमेश चव्हाण, उपनिरीक्षक लोकेश पवार, सहायक फौजदार, राजेद सांळुखे, अविनाश पाटील, हेका युवराज नाईक, नितीन श्रीराम सोनवणे, दत्तात्रय महाजन, कैलास पाटील, दिपक ठाकुरनाईक नितीन किसन आमोदकर, शांताराम सिताराम पवार, गोवर्धन राजेंद्र बोरसे, संदिप ईश्वर पाटील, भुपेश वंजारी, संदिप माने, ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, देविदास संतोष पाटील, दिनेश विक्रम पाटील, प्रेमसिंग नरसिंग राठोड, विजय पाटील, संदिप पाटील, पो. कॉ. हिराजी देशमुख, नंदकुमार जगताप, मालती बच्छाव, व चालक अनिल आगोणे, मनोहर पाटील या पथकाने केली.
हे वाचलंत का ?
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.